नगरपालिका निवडणुकीतील घराणेशाही


 नगरपालिका निवडणुकीतील घराणेशाही.   (हेरंब कुलकर्णी यांच्या पोस्ट वरून)


दै. सकाळ वृत्तपत्राने मंगळवारच्या  अंकात नगरपालिका निवडणुकीत वेगवेगळ्या जिल्ह्यातील घराणेशाही मांडली आहे. त्यानुसार...


नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींना भाजपाने उमेदवारी देऊन घराणेशाहीचा वेगळाच आविष्कार घडवला आहे.नगराध्यक्षपदी गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली तर नगरसेवक पदासाठी गजानन सूर्यवंशी यांची पत्नी गोदावरी भाऊ सचिन सूर्यवंशी भावाची पत्नी सुप्रिया मेव्हणा युवराज वाघमारे भाच्याची पत्नी रीना व्यवहारे या सर्वांना उमेदवारी दिली आहे. 


महाराष्ट्रात इतर ठिकाणी असलेली घराणेशाहीची झलक पुढीलप्रमाणे : 


१) नंदुरबार _ आमदार रघुवंशी यांच्या पत्नी

२)दोंडाईचा _मंत्री रावल यांची आई

३)शिरपूर_ माजी मंत्री अमरीश पटेल यांचा मुलगा व भाऊ

४)बुलढाणा _ आमदार संजय गायकवाड यांची पत्नी

५)खामगाव _ मंत्री आकाश फुंडकर यांची भावजयी 

६)वाशिम _ शिवसेना जिल्हाप्रमुख यांची पत्नी

७)यवतमाळ _मंत्री अशोक उईके यांची मुलगी

८)यवतमाळ _शिवाजीराव मोघे यांची सून

९)पुसद _मंत्री इंद्रनील नाईक यांची पत्नी

१०)चंद्रपूर _ माजी आमदार सुभाष धोटे यांचे बंधू 

११)धामणगाव रेल्वे _ आमदार प्रताप यांच्या भगिनी 

१२)दर्यापूर _ अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांची पत्नी

१३)दर्यापूर _आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे 

१४)चिखलदरा _ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ

१५)भंडारा _आमदार नरेंद्र भोंडेकर यांची पत्नी

१६)देवळी (वर्धा) _माजी खासदार रामदास तडस यांची पत्नी

१७)अकलूज _माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील यांचे पुतणे

१८)अकलूज _ आमदार रणजितसिंग मोहिते यांचे चुलत पुतणे

१९)अकलूज _ माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांची सून 

२०)करमाळा _27 वर्ष नगराध्यक्ष राहिलेल्या गिरधर दासदेवी यांची सून 

२१)दुधनी _माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांचे पुतणे

२२)पंढरपूर _ आमदार भगीरथ भालके यांची पत्नी

२३)पंढरपूर _माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या 

२४)अनगर _ माजी आमदार राजन पाटील यांची सून

२५)बार्शी _माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांची पत्नी

२६)अक्कलकोट _आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा भाऊ

२७)जामनेर _ मंत्री गिरीश महाजन यांची पत्नी 

२८)भुसावळ _मंत्री संजय सावकारे यांची पत्नी

२९)चाळीसगाव _आमदार मंगेश चव्हाण यांची पत्नी

३०)पाचोरा_ आमदार किशोर पाटील यांची पत्नी व मुलगा

३१)मुक्ताईनगर _आमदार चंद्रकांत पाटील यांची मुलगी

३२)अंमळनेर _ आमदार अनिल पाटील यांची पत्नी

३३)पारोळा_ माजी मंत्री सतीश पाटील यांची सून


३४)पारोळा_माजी नगराध्यक्ष करण पवार यांची पत्नी


३५)संगमनेर येथे आमदार सत्यजित तांबे यांची पत्नी 

३६)संगमनेर येथेआमदार अमोल खताळ यांची वहिनी

३७)फलटण येथे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे भाऊ

३८)पिंपळगाव बसवंत येथे खासदार भास्कर भगरे यांचे मेव्हणे

३९)मुरगूड येथे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांची पत्नी

४०)मुरगूड येथे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांची पत्नी 

४१)जयसिंगपूर येथे आमदार राजेंद्र पाटील यड्रवकर यांचा भाऊ

४२)शिरोळ येथे आमदार अशोक माने यांची सून

४३)ईश्वरपूर येथे माजी मंत्री अण्णा डांगे यांचा मुलगा चिमण डांगे

४४)ईश्वरपूर येथे वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांचा मुलगा

४५)आष्टा येथे माजी आमदार विलासराव शिंदे यांचा मुलगा

४६)विटा येथे आमदार सुहास बाबर यांचा भाऊ 

४७)विटा येथे माजी आमदार सदाशिव पाटील यांची सून

४८)रत्नागिरी येथे माजी आमदार सुरेंद्र माने यांची सून


अशी थोडक्यात झलक आहे 

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मी २८८ मतदार संघातील घराणेशाही चा अभ्यास केला होता २३८ मतदारसंघात २३८उमेदवार घराणेशाहीचे होते पण आता नगरपालिका निवडणुकीत बहुतेक ठिकाणी पुन्हा याच आमदार खासदारांच्या घरातील भाऊ सून मुलगा मुलगी व नातेवाईक यांनाच तिकिटे दिली आहेत आणि हे चित्र सर्वच पक्षांमध्ये आहे..

 नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका, जिल्हा परिषद,पंचायत समिती या नेतृत्वाच्या खऱ्या अर्थाने कार्यशाळा आहेत. येथे गाव पातळीवरील नेतृत्व घडून ते पुढे सरकावे अशी अपेक्षा आहे पण तिथे सुद्धा प्रस्थापित घराण्याचे उमेदवार असतील तर सर्वसामान्य कुटुंबातील नेतृत्व कसे पुढे येणार ? हा खरा प्रश्न आहे.

 आमच्याच घरात मंत्रिपद,आमच्याच घरात खासदारकी,आमच्याच घरात आमदारकी आणि आमच्याच घरात नगराध्यक्ष, नगरसेवक पद असेच जर चालणार असेल तर लोकशाहीच्या नावाखाली ही राजेशाही आहे..

 तेव्हा महाराष्ट्रातत घराणेशाही सरसकट पराभूत करा असा अजेंडा घेऊन काही निवडणुकात काम करावे लागेल तरच घराणेशाहीतून महाराष्ट्राची सुटका होऊ शकेल....

Comments

Popular posts from this blog

लक्षपूर्वक वाचा माफीवीर सावरकर.? शिवरायांच्या कार्याला "काक कालीये योग" म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला असे संबोधून शिवरायांचे कर्तृत्व नाकरणारा सावरकर कोणाला ग्रेट वाटेल.?

श्री. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पक्षातील नेता कसा बरोबर आहे, हे सांगण्याचा अयशस्वी प्रयत्न केला त्याचीचं पोलखोल करणारी ही पोस्ट.

केंद्र सरकार मजुरांना खरच मोफत रेल्वे नी त्याच्या मूळ गावी घेऊन गेलेत का ? तर वाचा खरं सत्य आणि भाजपाचा खोटारडा प्रचार